इंग्रजी व्याकरण - Articles (उपपदे)

इंग्रजी व्याकरण - Articles (उपपदे)

इंग्रजी व्याकरण: Articles (उपपदे)

इंग्रजी व्याकरणामध्ये Articles (उपपदे) हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. मराठी भाषेत स्वतंत्र 'उपपदे' नसली, तरी इंग्रजी शिकताना त्यांचा वापर समजून घेणे गरजेचे आहे.इंग्रजीमध्ये a, an, a the ही तीन उपपदे आहेत. a, an यांना अनियामक उपपद (indefinite articles) म्हणतात. the है नियामक उपपद (definite article) आहे. आपणास व an, the कोठे वापरावे. याचे नियम जसे शिकायचे आहे त्याचप्रमाणे a an आणि the कोठे वापरू नये याचेही नियम शिकायचे आहेत. उपपदांचा उपयोग आपण this, that, these. those या शब्दांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी करतो. वाक्यात जर नेहमीच this, that, those व these यांचा वापर केला गेला तर भाषेचे सौंदर्यच नष्ट होईल. ऐकतांना सुद्धा आपण काही तरी विचित्र ऐकत आहोत असे वाटेल, असे न वाटण्यासाठी आपणास this, that these those च्या ठिकाणी a an किंवा the यांचा नियमाप्रमाणे उपयोग करावा लागतो. कोणत्याही परीक्षेमध्ये या विभागावर साधारणतः एक दोन माकांचे प्रश्न असतात. केवळ माकांसाठी हा विभाग न शिकता आपण जे इंग्रजी लिहितो ते अचूक कसे बनेल. समोरच्याचे लक्ष कसे वेधून घेईल याकरीता हा विभाग अभ्यासावा.

१. उपपदे म्हणजे काय? (What are Articles?)

नामाच्या (Noun) आधी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना Articles म्हणतात. हे शब्द एखादी वस्तू निश्चित (Specific) आहे की अनिश्चित (General) आहे, हे दर्शवतात.

उपपदांचे प्रकार (Types of Articles)

  • Indefinite Articles (अनिश्चित उपपदे): A, An (सामान्य गोष्टींसाठी)
  • Definite Article (निश्चित उपपद): The (विशिष्ट गोष्टींसाठी)

२. 'a' आणि 'an' चा वापर (Uses of 'a' and 'an')

या उपपदांची निवड ही शब्दाच्या उच्चारावर (Sound) अवलंबून असते.

'a' चा वापर:

An article ‘a’ is used before words whose pronunciation is started with consonant sound. ज्या नामाची सुरुवात व्यंजनाने होते, त्या नामापुर्वी हे उपपद वापरतात. ज्या एकवचनी अथवा नामाची शब्दाची सुरुवात व्यंजन ध्वनीने (Consonant Sound) होते, त्यापूर्वी 'a' हे उपपद वापरतात.

उदाहरणे:

  • a boy (अ बॉय) – 'ब' हे व्यंजन आहे.
  • a dog
  • a pen
  • a book
  • a car
  • a teacher
  • a school
  • a house
  • a city
  • a friend

काही महत्त्वाची उदाहरणे:

  • a university
  • a union
  • a unit
  • a one rupee note
  • a European man
  • a universal
  • a usual
  • a useful article
  • a one side
  • Explaination

    A university, a union, a unit, a one rupee note, a European man, a universal, a usual, a useful article, a one side (येथे नामाची सुरुवात जरी u, o, किंवा e ने होत असली तरी त्यांचा उच्चार अनुक्रमे युनिव्हर्सिटी, युनियन, युनिट, वन रुपी नोट, युरोपियन मॅन, युनिव्हर्सल, युसअली, युजफुल आर्टीकल, वन साईड असा व्यजनाने सुरू होणारा आहे. म्हणून या शब्दांच्या पुर्वी a हे उपपद वापरले आहे.)

    'An' चा वापर:

    An article ‘an’ is used before words whose pronunciation is started with vowel sound. ज्या एकवचनी शब्दाची सुरुवात स्वर ध्वनीने (Vowel Sound) होते, त्यापूर्वी 'an' हे उपपद वापरतात

      उदाहरणे:

    • An Apple (ॲन ॲपल) – 'ॲ' हा स्वर आहे.
    • An Hour (ॲन अवर) – येथे 'H' सायलेंट असून उच्चार 'अ' (स्वर) पासून होतो.
    • an elephant
    • an orange
    • an umbrella
    • an egg
    • an owl
    • an idea
    • an artist
    • an engineer
    • an hour

    ३. उपपदे वापरण्याचे महत्त्वाचे नियम

    नियम स्पष्टीकरण उदाहरण
    उच्चार तपासा उच्चार मराठीतील स्वरांसारखा (अ, आ, इ, ए...) असेल तर 'An' वापरा. An M.A. ('ए' उच्चार)
    व्यंजन उच्चार उच्चार मराठीतील व्यंजनांसारखा (क ते ज्ञ) असेल तर 'A' वापरा. A One-rupee note ('व' उच्चार)
    एकवचन नियम A आणि An फक्त एकवचनी नामांसोबतच वापरता येतात. A book (बरोबर)
    मोजता न येणारी नामे पाणी, तेल, साखर यांसारख्या नामांपूर्वी A/An वापरू नका. Water (A water चुकीचे)

    थोडक्यात लक्षात ठेवा:

    जर शब्दाचा मराठीत उच्चार करताना सुरुवात स्वराने होत असेल, तर डोळे झाकून 'An' वापरा आणि जर व्यंजनाने होत असेल, तर 'A' वापरा!


    📝 MCQ Test

    1. I saw ___ elephant.

    a an

    2. She is ___ teacher.

    a an

    3. He ate ___ apple.

    a an

    4. This is ___ book.

    a an

    5. He is ___ honest man.

    a an

    6. She bought ___ umbrella.

    a an

    7. I have ___ dog.

    a an

    8. He is ___ engineer.

    a an

    9. This is ___ university.

    a an

    10. She is ___ MLA.

    a an

    Share on Google Plus

    About Vikas Dev

    This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.